तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.
झराझरा ती चित्रं मागे पडावीत अन कुंचला गुंतावा एक अगम्य चेहरा रेखाटण्यात. तो चेहरा रंगवण्यात कुंचला पार गुंगुन जावा अन आपण मनाशी तो चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत रहावा. जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
या लेखनावरचे मिसळपाव डॉट कॉम वरचे प्रतिसाद पहा.
३ टिप्पण्या:
तूम्ही खूपच तरल लिहीता... फ़ार बरं वाटले वाचून !!
आनंदयात्री.
फारच सुरेख लेखन. खूप आवडले.
कदाचित अशा खरेदीच्या घोळात सतत
अडकत असल्यामुळे असेल.
sashtanga namaskar!आनंदयात्री.
फारच सुरेख लेखन. खूप आवडले
अशा घोळात सतत
अडकत असल्यामुळे असेल! just kidding!
prachand chan lihilay.nirvivad.
टिप्पणी पोस्ट करा