साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती. त्याला वाटले आपल्या सारख्या माणसाचे आयुष्य पण त्या उसाचा कांडासारखेच सारखेच असावे, रसरशीत तारुण्य कामाच्या बोज्यात पिळुन निघावे अन मग उतरत्या वयानुसार उरलेसुरेली चिपाडं पण एकानंतर एक परत परत सारखी सारखी चरकातुन पिळुन काढली जावीत. कोरडी ठाक झाल्यावर चरकाच्या अगदी मागच्या बाजुला ठेवलेल्या पोत्यात अश्याच अनेक चोथा झालेल्या चिपाडांबरोबर नंतर बेमालुम मिसळुन जाणारी.
नारायणगाव पुणे यस्टी भस्सकन ष्ट्यांडात घुसली आणी थांबली तशी लोकं एकच घाई करुन उतरली ..
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.
मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."
तिच्या आवाजातला परकेपणा त्याच्या मनात विंचवाच्या नांगीसारखा रुतला. तसेच मागे फिरुन त्याने दोन उसाची कांडकी काड्ड्कन घुडघ्यावर मोडली अन खटका ओढुन चरकात ती सारली तेच त्याची बोटे एका हिसड्याने चरकात पिळली गेली. टपाटपा रक्ताच्या धारेने रसाचे भांडे भरायला लागले होते. रघ्या ग्लानीत जातांना त्याला डॉळ्यासमोर नविन चकचकीत कागद दिसत होता, चमकी दिसत होती आणी ती दिसत होती .. ढगळ पंजाबी ड्रेसमधे, बॅग छातीशी घेउन चालणारी. तो आपल्याकडे पहातोय हे समजुन लाजणारी ..
सोमवार, १८ जानेवारी, २०१०
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०
आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!
हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या. त्या गणेशाच्याही वर सुंदर वेलबुट्टीने मढवलेले गेरुनेच लिहलेले नाव होते 'परिमल'.
घर जुने होते, मातीचे होते. आत शिरले की उबदार वाटायचे. समोरच्या खोलीत माझे आवडते पुस्तकांचे कपाट होते. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना वाचनाची आवड होती. त्या कपाटातच एक जाडजुड लाकडी रुळ होता, त्याला मात्र मी जाम घाबरत असे. मला त्यांनी कधी तो दाखवला नव्हता पण मावश्या त्याला ज्या पद्धतीने घाबरत ते पाहुन मी पण त्याला घाबरत असे. सकाळी देवपुजा झाली की आजोबा मला पाढे लिहायला बसवत, "सुट्ट्यात कसले हो पाढे ? " असे म्हटले की कधी कधी आज्जीच्या अपरोक्ष मला हळुच सुटही देत.
त्या माझ्या आजोळच्या घराच्या मागे अंगण होते. तिथे मी त्या वयात पाहिलेला सगळ्यात मोठा हौद होता. तो हौद धुवायचाही कधे मधे कार्यक्रम असे. हौदाच्या खालचे आउटलेट मोकळे करुन आजोबा सगळे पाणी सोडुन देत, मोठ्ठी धार सुटे. मला त्या वेगवान धारेशी खेळायला मौज वाटे. हौद अर्धा अधिक मोकळा झाला की आजोबा मला त्यात सोडत. त्या क्षणाची वाट मी त्या काळी अगदी प्राण कंठाशी आणुन करे. त्या पाण्यात खेळुन झाले की मग मात्र मला काम करायचे असे, आजोबा पुन्हा उरलेले पाणी सोडुन देत आणी मग मी सगळा हौद साफ करायचा असे. हौदाच्या तळाशी मउ मउ स्वच्छ वाळु सापडे. ती सगळी वाळु मी जमा करुन आज्जीकडे देत असे, घुडघा शेकायला आज्जी ती वाळु वापरे.
त्या मागच्या अंगणात हौदासमोर वेगवेगळी झाडे लावलेली होती, त्यांच्याबुंध्यापाशी नीटस आळी केलेली असत. त्या आळ्यातल्या मातीशी खेळणे, तिथे हरबरा, तीळ वैगेरे पेरणे हा माझ्या अत्यंत आवडता उद्योग होता. मी त्या आळ्यांना माझी शेती म्हणत असे. मी सकाळी उठल्या उठल्या आधी माझी शेती बघायला जाई. एकेदिवशी खरेच अगदी इवलुस्से पाते उगवुन आले होते, मला तर आभाळच ठेंगणे राहिले होते. आजोबांना माझ्या घरी पाठवुन आईला बोलावुन आणले होते. दिवसभर त्या पात्याशेजारी बसुन राहिलो होतो. त्याचा कोवळा पोपटी रंग नंतर मी कितीतरी चित्रात वापरायचो असे आई सांगते (मला काही तशी एक्झ्याक्ट शेट कालवता यायची नाही, मग आईच तसा रंग बनवुन द्यायची). दुपारभर माझे असेच काहीतरी त्या झाडांजवळ उद्योग चालायचे. मग नंतर मी ४ वाजायची वाट पहात राही. कारण ४ वाजेपर्यंत माझ्या तीनही मावश्या घरी आलेल्या असत. मग काय लाडोबाची मजा असायची. खुप हट्ट केला तर दुधाएवजी कधीतरी चहाही चाखायला मिळे (गंधाच्या वाटीत). क्रिमचे बिस्किट म्हणजे पर्वणी.
अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.
जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)